डी.एस.कुलकर्णी यांचा प्रचार करणार माधुरी दीक्षित

April 17, 2009 8:40 AM0 commentsViews: 10

16 एप्रिलनिवडणुकीतलं स्टार वॉर आता पुण्यात पोहोचलंय. आपल्या खास अदांनी लाखोंना घायाळ करणारी धकधक गर्ल माधुरी दीक्षित आता पुण्यात बसपाचा प्रचार करणार आहे. माधुरी दीक्षित बसपाचे उमेदवार डी.एस.कुलकर्णी यांचा प्रचार करणार आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांमधे एकीकडे चढाओढ सुरू असताना स्टार्सही इतर पक्षाचा प्रचार करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. राजकीय पक्षांप्रमाणेच स्टार्सही यंदाच्या निवडणुकांमध्ये अधिक रस घेताना दिसताहेत. राजकारण आणि पब्लिसिटी यांचं अचूक गणित आखून राजकीय पक्ष आणि स्टार्स निवडणूक प्रचारासाठी राज्यभरात जबरदस्त फिल्डिंग लावत असल्याचं दिसून येत आहे. पण अशा समीकरणात कधीही अडकून न पडणारे स्टार्सही निवडणूक प्रचारात का सहभागी होत आहेत, याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे याबद्दल स्टार्सच्या चाहत्यांनाही उत्सुकता वाटतेय.

close