पोलीस भरती तरुणाच्या जीवावर बेतली

June 13, 2014 5:23 PM0 commentsViews: 5257

police_bharti13 जून : पोलीस भरती तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना मुंबईत घडलीय. मुंबईत पोलीस भरतीदरम्यान भोवळ येऊन खाली पडलेल्या विशाल केदारे या तरुणाचा मुलुंडच्या प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.

आज (शुक्रवारी) सकाळी ही घटना घडली होती. बुधवारी दुपारी विशालला बरं वाटत नसल्याने मुलुंडच्या प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. विशाल केदारे हा नाशिकचा रहिवासी आहे. या आठवड्यातील मुंबईतील ही दुसरी घटना आहे. मंगळवारी अंबादास सोनावणे याचाही पोलीस भरती दरम्यान मृत्यू झाला होता.

अंबादासचा धावाताना धाप लागल्यामुळे तो कोसळला होता त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, उन्हाळ्यात कुणी भरती घेतली याची चौकशी करावी आणि तिघांच्या नातेवाईकांना सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते विनोद तावडे यांनी केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close