लो – कॉस्ट हाऊसिंग धोक्यात

April 17, 2009 8:53 AM0 commentsViews: 2

17 एप्रिल लो कॉस्ट हाऊसिंग आता धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण सिमेंटच्या किंमती बोगसपणे वाढवण्यात येत असल्याचा आरोप बिल्डर असोसिएशननं केला आहे. सिमेंट कंपन्यांनी प्रत्येक पन्नास किलो गोणीची किंमत 270 रुपये केलीये. किंमतीतल्या या वाढीमुळं बिल्डर्सनाही घरांच्या किंमती वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचं स्पष्ट केलंय. सरकारनं जानेवारी 2009 पासून सिमेंटवर आठ टक्के आयात कर लावल्यानं सिमेंट कंपन्यांनी किंमती वाढवल्यात. सिमेंट कंपन्यांच्या या भाववाढीवर सरकारही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप बिल्डर असोसिएशननं केलाय. बिल्डर्स आणि सिमेंट कंपन्याच्या वादात नुकसान मात्र ग्राहकांचं आहे. कारण बजेटमध्ये घर घेणं त्यांना शक्य होणार नाही.

close