मोदींचा बळीराजासाठी ‘मान्सून प्लॅन’ !

June 13, 2014 10:07 PM0 commentsViews: 1064

235Naredra modi @ work
13 जून : यंदा पाऊस कमी पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यानंतर केंद्र सरकारने आपत्कालीन नियोजन केलंय. सर्व राज्य सरकारांना तातडीनं पावलं उचलण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शेतकर्‍यांना बियाणं आणि पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर बियाण्यांवरचं अनुदान वाढवण्याचाही सरकारचा विचार आहे. याबाबतच आज (शुक्रवारी) संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांची बैठक घेतली. जवळपास अडीच तास ही बैठक चालली. कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांनी यावेळी सादरीकरण केलं. या बैठकीला जलसंधारण मंत्री उमा भारती, अर्थमंत्री अरुण जेटली, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान आणि खते आणि रसायन मंत्री अनंत कुमार उपस्थित होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close