प्रीती-वाडियामध्ये बिनसलं, विनयभंग प्रकरणी FIR दाखल

June 14, 2014 1:25 PM0 commentsViews: 3710

31priti_zinta_ness14 जून : प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटाने तिचा माजी प्रियकर आणि उद्योजक नेस वाडिया याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री प्रीती झिंटाने वाडियाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा केला दाखल होता. त्यानुसार पोलिसांनी पुढील कारवाई करत 354, 504, 506, 509 या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील किंग इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर कींग्ज मॅचदरम्यान नेस वाडिया यांनी पॅव्हेलियन मध्ये येऊन सर्वासमोर छेडछाड केली होती, त्याचबरोबर शिवीगाळही केली होती अशी तक्रार प्रीतीनं केलीय.

मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा ही तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी नेस वाडिया यांच्या विरोधात 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, नेस वाडियाने ही तक्रार बिनबुडाची असल्याची प्रतिक्रिया दिलीय. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी वानखेडे स्टेडियमकडे मॅचदरम्यान असलेलं स्टँडमधील सीसीटीव्ही फूटेज मागवलंय. वानखेडे स्टेडियमच्या 172 सीसीटीव्ही कॅमेर्‍याचं फूटेज मुंबई पोलिसांनी मुंबई किक्रेट असोसिएशन कडून मागवलं आहे.

‘मला माझं रक्षण करायचंय’

या संपूर्ण प्रकरणी प्रीती झिंटाने एक निवेदन जारी केलंय. “माझ्यासाठी ही खूप खडतर वेळ आहे आणि मी मीडियाला विनंती करते की, या प्रकरणी माझ्या प्रायव्हसीचा आदर राखावा. कोणालाही त्रास देण्याचा माझा हेतू नाही पण मला माझं रक्षण करायचंय.”

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close