राज्य सरकारची टोलवाटोलवी सुरूच

June 14, 2014 11:29 AM0 commentsViews: 558

TOll IRB14 जून : एकीकडे राज्यातील 44 टोलनाक्यांवर 1 जुलैपासून टोलवसुली होणार नाही अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली होती.

तर दुसरीकडे मात्र टोलबंदीबाबत अद्याप अंतीम निर्णय घेतला नसल्याचं निवेदन सरकारतर्फे हायकोर्टात करण्यात आलंय. यासर्व प्रकारामुळे टोलबंदीबाबत सरकारची टोलवाटोलवी अद्यापही सुरूच असल्याचा प्रकार समोर येतोय.

टोलबंदी करण्याची घोषणा झाली असली तरी यासाठी राज्यसरकारला अधिसुचना काढावी लागणार आहे. यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता 1 जुलैपासून टोलवसुली होणार नाही असं उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close