चितळे समितीचा अहवाल आज विधानसभेत सादर होणार

June 14, 2014 11:25 AM0 commentsViews: 238

Image img_235422_vidhanbhavan44_240x180.jpg14 जून : चितळे समितीचा अहवाल आज (शनिवारी) विधानसभेच्या सभागृहात मांडण्यात येणार आहे. त्या आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळ्यावरचा चितळे समितीचा अहवाल शुक्रवारी विधानसभेत फोडला होता.

या अहवालात गेल्या दहा वर्षांत शून्य पूर्णांक 1 टक्क्यापेक्षाही कमी सिंचन झालं, असा गंभीर निष्कर्ष या अहवालात काढण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. अहवालात प्रकल्पांच्या अनियमिततेसाठी अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात आलंय.

तर विदर्भ सिंचन विकास मंडळाच्या प्रकल्पांतल्या अनियमिततेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जबाबदार धरण्यात आलंय. पण, त्यांच्याबाबत निर्णय सरकारनं घ्यावा असंही या अहवालात म्हटलं आहे. अधिकार्‍यांवर मात्र विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close