सत्यम – टेक महिंद्रा सौद्याला मंजुरी

April 17, 2009 9:02 AM0 commentsViews: 2

17 एप्रिल कंपनी लॉ बोर्डानं अखेर सत्यम आणि टेक महिंद्रमधील सौद्याला मंजुरी दिलीय. आता नियमांप्रमाणे सत्यमचा मॅनेजमेंट कंट्रोल मिळवण्यासाठी टेक महिंद्रला सुमारे 2 हजार 900 कोटी रुपये जमा करायचे आहेत. उरलेल्या एकतीस टक्के हिस्सेदारीसाठी 21 एप्रिलपर्यंत टेकला 1,757 कोटी रुपये द्यायचे आहेत. आता टेक महिंद्र तीन वर्षांपर्यंत सत्यममधील हिस्सेदारी विकू शकणार नाही. त्याचप्रमाणे सत्यमचे ऍसेट्सही त्यांना दोन वर्षांपर्यंत विकता येणार नाहीत. सत्यमला त्यांचे रिझल्टस आणि नव्या खात्यांची माहिती 31 डिसेंबर पर्यंत सादर करायची आहे. सत्यम बोर्डानं नव्या संचालक मंडळासाठी सी.पी.गुरनानी, विनीत नैय्यर, उल्लास यारगोप आणि संजय कालरा यांची शिफारस सीएलबीकडे केलीय.

close