महिंद्रा रॅली सुसाट

June 14, 2014 6:25 PM0 commentsViews: 1239

14 जून : एकापेक्षाएक सरस रेसकार्स..नॅशनल चॅम्पिअन्सचा दिमाख…जोष आणि धमाल अशी थाटात सुरुवात झालीए नाशिकमध्ये महिंद्रा ऍडव्हेंचर रॅली ऑफ महाराष्ट्राला. भंडारदर्‍याच्या दर्‍याखोर्‍यात, कळसुबाईच्या शिखराभोवती या नॅशनल चॅम्पियन्सच्या स्कील्सची कसोटी लागणार आहे. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी हिरवा झेंडा दाखवून या कार रॅलीचं उद्घाटन केलं. यावेळी हर्शिता गौड, गिरिमा अवतार आणि सुखबन्स मान या महिला स्पर्धकांचा सहभाग यंदाच्या कार रॅलीचं विशेष आकर्षण ठरलंय. मागच्या वर्षीचा विजेता गौरव गीलच्या कामगिरीकडे सगळ्यांचं विशेष लक्ष लागलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close