कॅम्पा कोलावर 17 जूनला हातोडा

June 14, 2014 6:27 PM0 commentsViews: 554

435campa_coala14 जून : मुंबईतील वरळी स्थिर कॅम्पा कोला कम्पाऊंडवर कारवाई करण्यासाठी मुंबई पालिकेनं ‘बाह्या’वर सरसावल्या आहे. कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना 488 ची नोटीस देण्यात आली आहे. पाणी आणि वीज कापण्याच्या कारवाईला सुरुवात करण्याची ही नोटीस देण्यात आली आहे. मंगळवारी 17 तारखेला सकाळी 11.30 वाजता अनधिकृत मजले तोडण्याच्या कारवाईला सुरुवात करणार आहे.

या नोटिशीत महापालिकेनं कारवाईचा उल्लेख केला आहे. सुप्रीम कोर्टाने घरं खाली करण्याची मुदत गुरुवारी संपली. मात्र कोणत्याही परिस्थीती घरं खाली करणार नाही असा पवित्रा रहिवाशांनी घेतला आहे. पालिकेनं रहिवाशांना नोटीसही बजावल्यात. अनधिकृत मजले तोडण्यासाठी पालिकेने कंत्राटही जारी केलं पण याला फारसा प्रतिसाद लाभला नाही.

कॅम्पा कोलाचे अनधिकृत मजले तोडण्यासाठी कोणताही कंत्राटदार समोर आला नाही. पण कारवाई करण्यासाठी पालिकेला तुर्तास कंत्राटदाराची गरज नाही. पालिका सुरुवातील अनधिकृत घरांच्या भिंती तोडण्याची कारवाई करुन घरं ताब्यात घेऊ शकते यासाठी पालिकेनं 17 जूनचा मुहूर्त साधला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close