अजित पवार यांच्या खोचक सल्ल्याला उध्दव ठाकरे यांचं चोख उत्तर

April 17, 2009 9:31 AM0 commentsViews: 37

16 एप्रिलएकमेकांवरच्या आरोप प्रत्यारोपांमुळे निवडणूक प्रचार चांगलेच रंगत आहेत. पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना गड-किल्ल्यांच्या फोटोचं प्रदर्शन भरविणार्‍यांनी फोटो स्टुडिओ टाकावा, असा सल्ला दिला होता. यावर चाकणच्या सभेत बोलताना शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. 'राजकारणापेक्षा गडकिल्ल्यांवरून फोटोग्राफी करण्यात रममाण असणारे राजकारणी पक्ष आणि राजकारण काय बघणार', असं खोचक विधान करत अजित पवार यांनी पुण्यात आपल्या सभेमधे शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांचं राजकीय कार्य आणि त्यांच्या कलागुणांवर टीका केली आहे. अजित पवार यांनी काढलेल्या या कळीचचोख उत्तर देताना शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी 'काका आणि पुतण्या दोघेही वेडे झाले आहेत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्धार करून अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

close