प्रदेश भाजपाने भरवलं शरद पवार यांच्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन

April 17, 2009 10:05 AM0 commentsViews: 97

17 एप्रिल, मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर व्यंगचित्र काढून ती प्रसिध्द करण्याचा मोह काँग्रेसलाही आवरता आला नव्हता. दहा वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या शरद पवार यांच्या व्यंगचित्राचं प्रदर्शन आता मुंबईत भरवण्यात आलं आहे. 1999 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी प्रदेश काँग्रेसनं शरद पवार यांच्या व्यंगचित्रांची एक पुस्तिका प्रकाशित केली होती. या व्यंगचित्रांमध्ये शरद पवार यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचं मनोमिलन किती खरं आहे, हे व्यंग चित्रावरून स्पष्ट होत आहे. दोन्ही काँग्रेसचा मतलबीपणा जगजाहीर करण्यासाठी हे प्रदर्शन भरवलं असल्याचं प्रदेश भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांचं म्हणणं आहे.

close