असा आहे मोटो-ई !

June 14, 2014 10:46 PM4 commentsViews: 5544

sankalp_mantri_ibnlokmatसंकल्प मंत्री, आयबीएन लोकमत

इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये सगळं काही विकतं. मग ते स्वस्त असो वा महाग अथवा एखाद्या ब्रँडची नकलही असो इथं सगळं काही विकतं. पण जे विकतं ते टिकतं असंही नाही. त्यामुळे इथं एखादी वस्तूच जर घ्यायची ठरली तर ‘ताकही फुंकून प्यावं’ असंच काहीस करावं लागतं. बरं, त्यातच सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा (म्हणजे तो काहीजणांनी करून घेतला) मोबाईल फोन आला तर मग कुठला मोबाईल घेऊ? हा घेऊ की तो घेऊ असं बर्‍याच जणांचं होतं.

अँड्रॉईड फोनच्या त्सुनामीमुळे मोबाईल इंडस्ट्री ढवळून निघाली. सेम क्वॉलिटी, सेम फिचर आणि शेकडो कंपन्या मग घेणार कुठला ? शक्यतो फोन घेताना आपल्या मित्रांनी घेतला, ऑफिसमध्ये सहकार्‍याने घेतला किंवा ‘लई भारी’ वाटला म्हणून सेम फोन आपण विकत घेतो. पण जर तुमच्या ‘खून पसीने की कमाई’ योग्य वस्तू घेण्यात गेली तर ती खर्‍या अर्थाने समाधानकारक ठरते. बरं त्यातही स्वस्त आणि मस्त फोन पाहिजेच. त्यामुळे एकेकाळी भारतीय मोबाईल मार्केटमध्ये दादा असलेली कंपनी मोटोरोला कात टाकून नव्या जोमाने मार्केटमध्ये उतरली आहे. मोटोरोलाने काही महिन्यांपूर्वी मोटो-जी हा फोन आणला आणि तो फोन तुफान चालला. काही तासांतच तो आऊट ऑफ स्टॉक झाला. मोटो-जीच्या या यशानंतर मोटोरोलाने आता मोटो-ई हा फोन आणलाय. हा मोटो-ई नेमका कसा आहे ते पाहूया, हा फोन पहिल्यांदाच बघितला तर असे म्हणू शकता, स्वस्त आणि मस्त फोन.

स्पेसिफिकेशन -

456_moto_e
कमी किमतीत या फोनचे स्पेसिफिकेशन थोडे दमदार आहेत. 1.2 डूयल कोअर प्रोसेसर आणि तुम्ही मेमरी 32 जीबी पर्यंत एक्स्टेन करू
शकता. या फोनची स्क्रीन एचडी असून एक जीबी रॅम इतकी क्षमता आहे.विशेष म्हणजे या फोनची स्क्रीन ही क्रॉर्निग ग्लास 3 प्रोटेक्शन आहे म्हणजे फोनवर स्क्रॅच पडण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र या फोनची साईजही फक्त 4.3 इंच आहे. त्यामुळे मोठ्या स्क्रीनवाल्या फोनची हौस पूर्ण होणार नाही. गुगलचे एकमद लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम या फोनमध्ये आहे. म्हणजेच अँड्रॉईड किटकॅट, जे फक्त थोड्याच फोन्सना गुगलने दिलंय.

बॅटरी -

665moto e
1980 लिथियम बॅटरी या फोनमध्ये आहे. म्हणजे फोनचा नॉर्मल यूजवर 8 ते 10 तास चालेल अशी अपेक्षा करू शकतो. या फोनला 5 एमपी कॅमेरा दिलाय. पण यात फ्लॅश नाही. लो लाईटमध्ये काढलेले फोटो एवढे चांगले येत नाहीत. या फोनमध्ये फ्रंट स्पेसिंग कॅमेरा नाही आहे. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉल करता येणार नाही. मुख्य गोष्ट म्हणजे या फोनचे कव्हर तुम्ही बदलू शकता. मोटोरोलाने 20 स्वॅपेबल कव्हर्स वेगवेगळ्या रंगात उपलब्ध करून दिली आहेत.

किंमत -

88790mote_e
हा फोन याच्या कॉम्पिटेटर्सपेक्षा एकदम स्वस्त आहे. हा फोन तुम्हाला 6,990 यामध्ये ऑनलाईन मिळतो. पण ओव्हरऑल बघितले तर मोटोरोलाने कमी पैशांत चांगला फोन काढलाय असे म्हणू शकतो. या फोनमुळे ज्यांना इतर ब्रँड्सवर विश्‍वास नाही ते लोक मोटोरोलाकडे वळू शकतात. सर्वसामान्य माणसाचा विचार करून हा फोन काढलाय असे आपण खात्रीने म्हणू शकतो.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Rahul Dhekale

  7k madhye motorola ghenyapeksha Iball andy 5k sparkal kititari patine chhan aahe. kimmat fakt 8k aani 8mp camera front camera video calling. aani android che sarv feturs aahet.

  • Rahul Raskar

   Iball bakwas aahe dost

  • vithoba jadhav

   are bhava pn iball mobile hang hotat slow chaltat tyamanane ya madhe 1gm ram n processor bhari ahe.
   vit

 • umesh jadhav

  रेडिएशन कितना देता है.ग्राहकाच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या महत्वपूर्ण बाबींना तुम्ही बगल का देता.

close