सिंचन प्रकल्पांना घाईत मंजुरी देण्यात आली – डॉ. माधवराव चितळे

June 15, 2014 4:46 PM1 commentViews: 612

15  जून : सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या डॉ. माधवराव चितळे समितीने घोटाळ्यासाठी अधिकार्‍यांना जबाबदार ठरवले आहे. समितीचे प्रमुख डॉ. चितळे यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लूझिव्ह मुलाखातीमध्ये सिंचन प्रकल्पांना घाईत मंजुरी दिल्याचे म्हटलं आहे. ‘सिंचन प्रकल्पांना घाईत मंजुरी देण्यात आली. अनुशेषाच्या नावाखाली खर्च झाला. प्रकल्पही वाढले. पण प्रत्यक्ष सिंचन उपलब्ध झालेच नाही अशी टीका चितळेंनी केली आहे.

2005 मध्ये राज्याने उत्तम जलनिती राबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्या जलनितीचे कार्यपालन केले गेले नाही अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. जलसिंचनाचे व्यवस्थाप शेतकर्‍यांच्या सहकारी पाणी वापर संस्थांकडून केले जाणार होते. मात्र ते होऊ शकले नाही. गेल्या 10 वर्षात आपण जलसिंचनातील उणीवा दूर करु शकलो नाही असे त्यांनी  सांगितलं.

चितळे समितीनं अजित पवारांना दोषी ठरवल्याची बाब सरकारनं कृती अहवालात दडवली, असा थेट आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. चितळे समितीच्या अहवालातील सरकारने आपल्याला अनुकूल तेच मुद्दे मांडले आहेत. अहवालात ठपका ठेवलेला असतानाही सरकार सोयीचा अर्थ लावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close