महाराष्ट्र हाच माझा मतदारसंघ – राज ठाकरे

June 15, 2014 8:14 PM2 commentsViews: 3216

rajthakare_dombivali_15  जून :   विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केल्यानंतर राज ठाकरे कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. याविषयी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्याला आमदार होण्यात काहीच रस नसून संपूर्ण महाराष्ट्रच माझा मतदारसंघ असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या विकासाबद्दलच्या योजना जुलै – ऑगस्टमध्ये स्पष्ट करू, असं सांगितलं.

राज ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईत राजगर्जना या पुस्तकाचं प्रकाशन झालं. मनसेच्या आमदारांनी विधानसभेत केलेल्या भाषणांचा हा संग्रह आहे. राजकारण्यांनीही काळाप्रमाणे बदललं पाहिजे, असं आवाहन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं.

पोलीस भरतीसाठी ग्रामीण भागातील तरुण मुंबईत येतात. उपाशीपोटी असताना त्यांना 5 किलोमीटर पळवतात. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील 100 मीटर तरी धावू शकतात का असा खोचक सवाल राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात उपस्थित केला. पोलीस भरती मुंबईत घेण्यापेक्षा त्या- त्या जिल्ह्यात का घेतली जात नाही असा सवालही त्यांनी गृहमंत्र्यांना विचारला.

अयोग्य कायदे बदला असं म्हणत चांगल्या कायद्यांची कठोर अंमलबजावणी करा मग महाराष्ट्र आपोआप सुतासारखा सरळ होईल असं ही ते म्हणाले. त्याचबरोबर तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी ठेवा असं आवाहन राज ठाकरेंनी मतदारांना केलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Govind Dalvi

    abki bar raj sarkar ..! Marathi manacha buland awaj …!

  • Amol Padher

    Geli asel loksabha, vidhansabha ajun baki ahe, aale astil modi tari Raj Ajun baki ahe. jay M.N.S. jay maharashtra

close