शिक्षिकेनं घेतला विद्यार्थिनीचा बळी

April 17, 2009 12:37 PM0 commentsViews: 1

17 एप्रिल, नवीदिल्ली होमवर्क केला नाही म्हणून शिक्षिकेनं केलेल्या शिक्षेत एका दुसरीत शिकणार्‍या विद्यार्थिनीला आपले प्राण गमवावे लागले आहेत. दिल्ली माहापालिकेच्या नरोला इथल्या प्राथमिक शाळेत ही दुदैर्वी घटना घडली आहे. शिक्षिकेचं नाव मंजू आहे तर विद्यार्थिनीचं शन्नो. शन्नो अकरा वर्षांची होती.शन्नोला बुधवारी शाळेत पोहोचायला उशीर झाला होता. त्यात तिने गृहपाठ केला नव्हता. त्यामुळे शिक्षिकेनं या मुलीचं डोकं आधी टेबलवर आपटलं आणि त्यानंतर तिला दोन तास उन्हात उभं केलं. यामुळे शन्नो कोमात गेली आणि तिचा उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका धनपती आणि शिक्षिका मंजू यांना निलंबित करण्यात आलं आहे.

close