अडवाणींचा स्वीस बँकेतल्या काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून हल्लाबोल

April 17, 2009 1:29 PM0 commentsViews: 7

17 एप्रिल, मुंबई भारतीयांनी स्वीस बँकेत दडवून ठेवलेला काळा पैसा भाजप सत्तेवर येताच 100 दिवसात भारतात परत आणणार असल्याचं भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार लालकृष्ण अडवणी यांनी आज मुंबईत सांगितलं. आज अडवाणींचा महाराष्ट्र दौरा आहे. ते औरंगाबाद, बीड, पुणे इथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभा घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज सकाळी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वीस बँकेतल्या काळा पैशाच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला. आजच्या पत्रकार परिषदेत अडवाणींनी स्वीस बँकेतल्या भारतीयांच्या काळ्या पैशाविषयीचं धोरणंही सांगितलं. स्वीस बँकेतला काळापैसा भारतात आणण्यासाठी भाजप चार सदस्यांची टास्क फोर्स तयार करणार आहे. या टास्क फोर्समध्ये महेश जेठमलानी, एस.गुरुमूर्ती, अजित डोव्हल (माजी आयबी चीफ), आर. विद्यानाथन (आयआयएम बंगलोर) यांचा समावेश असणार आहे. या टास्क फोर्सने काळ्या पैशाबाबत अहवाल तयार केला असून त्यावरून भारतीयांचा काळा पैसा हा देशासाठी विघातक न ठरता विधायक ठरायला हावा, असंही अडवाणी त्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

close