पन्नास वेळा पत्रं लिहूनही मुख्यमंत्री काम करत नाही -सुळे

June 16, 2014 7:35 PM0 commentsViews: 4991

76sule_on_cm16 जून : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष केलं जातंय. आज (सोमवारी) राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे परिसरात बेवारसपणे मृत्यू पावलेल्या प्राण्याची विल्हेवाट लावण्यासाठी ‘कारकस’ नावाचा प्रकल्प सुळे यांनी प्रस्तावित केला होता. हा प्रकल्प राबविण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पन्नास वेळा पत्र लिहिली मात्र त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याचं सांगत सुळे यांनी नाराजी व्यक्त केली.

 

तसंच टोल नाके आणि एलबीटीबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा अशी चर्चा त्यांच्यासह काँग्रेस नेत्यांचीही झाली असून त्याबाबतही आम्ही वेट अँड वॉच भूमिकेत असल्याचे सुळे यांनी सांगत मुख्यमंत्री विरोधी नाराजीचा सूर आळवला.

 

दरम्यान, जल सिंचनावरील भ्रष्टाचार संदर्भातील चितळे समितीच्या अहवालात आदर्शप्रमाणेच नेत्यांना क्लीनचीट आणि अधिकार्‍यांना दोषी धरलं गेलं. हे योग्य आहे का, याबबत विचारलेल्या प्रश्नावर,सुप्रिया सुळे यांना हा विषय आपल्या पुरता संपल्याचं सांगितलं. सुळे यांनी असं वक्तव्य करून ते एकाप्रकारे नेत्यांची पाठराखण करत असल्याचं सूचक विधान केलं असल्याचं बोललं जातंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close