आयपीएलच्या रणधुमाळीला सुरुवात

April 18, 2009 6:27 AM0 commentsViews: 8

18 एप्रिल, केपटाऊन आजपासून दक्षिण आफ्रिकेत सुरू होणा-या टी-20 च्या सामन्यांची सुरुवात सचिन तेंडुलकरच्या मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंग ढोणीच्या चेन्नई सुपरकिंग्ज या दोन संघांच्या सामन्याने होणार आहे. त्यानंतरचा सामना शेर्न वॉर्नच्या राजस्थान रॉयल्स आणि केविन पीटरसनच्या बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स संघात रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 4.00 वाजता सुरू होणार आहे. सचिन तेंडुलकर कर्णधार असणा-या मुंबई इंडियन्स या संघात सनथ जयसूर्या, शिखर धवन, जेपी ड्युमिनी, अजिंक्य रहाणे, ड्वेन ब्राव्हो, चैतन्य नंदा, अभिषेक नायर, मोहम्मद अश्रफुल, रायन मॅकलॅरेन, ग्रॅहॅम नेपिअर, हरभजन सिंग, झहीर खान, काइल्स मिल, लसित मालिंगा, दिलहार फर्नांडो, रोहन राजे, पिनल शहा, जयदेव शहा, राहिल शेख, योगेश ताकवले (यष्टिरक्षक), ल्युक रोंची (यष्टिरक्षक) हे खेळाडू आहेत. तर महेंद्रसिंग धोनी कर्णधार आणि यष्टिरक्षक असणा-या चेन्नई सुपरकिंग्जमध्ये पार्थिव पटेल (यष्टिरक्षक), सुरेश रैना, स्टिफन फ्लेमिंग, मॅथ्यू हेडन, एस. बद्रीनाथ, एस. विजय, आर. अश्विन, पी. अमरनाथ, अभिनव मुकुंद, ऍन्ड्यू फ्लिंटॉफ, मनप्रित गोणी, आल्बी मॉर्केल, एस. अनिरूद्ध, मुथय्या मुरलीधरन, मखाया एन्टिनी, लक्ष्मीपती बालाजी, जोगिंदर शर्मा, तिलान तुषारा, जॉर्ज बेली, नेपोलियन आईन्स्टाईन, विराज कडबे, शादाब जकाती, सुदीप त्यागी, एस. विद्युत, अरुण कार्तिक या खेळाडूंचा आंतरभाव असणार आहे. आजच दक्षिण आफ्रिकेत बंगळुरू रॉयलचॅलेंजर्स विरूद्ध राजस्थान रॉयल्समध्ये दुसरा सामना रांगणार आहे. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होणारेय. केविन पीटर्सन हा बंगळुरू रॉयलचॅलेंजर्सचा कर्णधार आहे. या संघात राहुल द्रविड, जॅक कॅलीस, मार्क बाऊचर, शीव नारायण चंदरपॉल, अनिल कुंबळे, वासिम जाफर, रॉस टेलर, विराट कोहली, डेल स्टेन, प्रवीण कुमार, जेसी रायडर, रॉबिन उथप्पा, भुवनेश्वर कुमार, टी. योहानन, मनिष पांडे, पंकज सिंग, सौरव बांदेकर, गौरव धीमन, नेथन ब्रॅकन, कॅमेरॉन वाईट, श्रीवत्स गोस्वामी, सुनील जोशी, विनय कुमार, जे. अरूण कुमार, के.पी. अपन्ना, देवराज पाटील, भरत चिपली, भालचंद्र अखिल हे खेळाडू आहेत. तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉर्न असून युसुफ पठाण, ग्रॅमी स्मिथ, स्वप्नील असनोडकर, सिद्धार्थ त्रिवेदी, रवीन्द्र जडेजा, नीरज पटेल, मेहश रावत, मुनाफ पटेल, शॉन टेट, दिमित्री मॅस्कॅरेन्हास, आदित्य आंगले, पराग मोरे, सिद्धार्थ चिटणीस, मॉर्ने मॉर्केल, टायरन हेन्डरसन, रॉब क्विनी, शेन हार्वूड, ली कर्सेलडाइन, नमन ओझा यांचा समावेश असणार आहे. यंदा आयपीएल स्पर्धेत राजस्थान, चेन्नई, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, पंजाब आणि कोलकाता या आठ संघांमध्ये एकूण 59 साखळी सामने रंगतील. या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडू नसणारेयत. मुंबईवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपल्या खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्यास बंदी घातली आहे. पण तरीही सामने दक्षिण आफ्रिकेत असल्याने आयपीएल स्पर्धा पाक खेळाडू खेळतील, असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. यंदाच्या आयपीएलच्या दुसर्‍या सिजनमध्ये रिकी पाँटिंग, मायकल हँसी, बेट ली, पाकिस्तानी खेळाडू आणि एस.श्रीसंथ सारखे अनेक मोठे खेळाडू दिसणार नाहीयेत. पण पाठीच्या दुखण्यामुळे आयपीएलमधून बाहेर पडलेला एस.श्रीसंथ आपल्या टीमच्या सोबत असण्यासाठी तो थेट दक्षिण आफ्रिकेत पोहोचलाय. व्ही.व्ही.एस.लक्ष्मण, राहुल द्रविड आणि आता सौरव गांगुली या भारतीय क्रिकेटच्या तीन महारथींची आयपीएलच्या पहिल्याच हंगामानंतर कॅप्टनपदावन हकालपट्टी करण्यात आली आहे. ही बाब यंदाच्या आयपीएलची सर्वात महत्त्वाची असणारेय.

close