वाडियाविरूद्ध तक्रारमागे घेण्यास प्रीतीचा नकार

June 17, 2014 1:58 PM0 commentsViews: 1727

120426780861817  जून : अभिनेत्री प्रीती झिंटा आणि उद्योगपती नेस वाडिया यांच्यात निर्माण झालेला वादने आता नवीनच वळण घेतलं आहे. प्रीती आणि नेस वाडिया यांच्या तडजोड होणार असून लवकरच प्रीती तक्रार मागे घेईल, अशी बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली होती. पण या बातमीत काहीच तथ्य नाही. त्या दोघांमध्ये कुठलीही तडजोड झालेली नाही, असं प्रीतीच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे.

आयपीएलदरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये नेस वाडियानं शिवीगाळ तसंच विनयभंग केल्याची तक्रार अभिनेत्री प्रीती झिंटाने केली होती. यावेळी तिथे एका विख्यात माजी क्रिकेटपटूचा मुलगाही तिथे होता. त्याचा जबाब घेण्याबाबत मुंबई पोलिसांनी अजून निर्णय घेतलेला नाही.

दरम्यान, प्रीतीने नेस वाडियाविरुद्ध लैंगिक छळ किंवा विनयभंगाची तक्रारच दाखल केलेली नाही. तिने गैरवर्तणुकीची तक्रार दाखल केल्याचं प्रीतीचे वकील हितेश जैन यांनी सांगितलंय. प्रीती सध्या परदेशात आहे. तिने स्वत: हजर राहून आठवडाभराच्या आत जबाब नोंदवावा, असं पत्र मुंबई पोलिसींनी प्रीतीला लिहिलंय. प्रीतीचा जबाब नोंदवल्यानंतरच नेस वाडियाची चौकशी करणार असल्याचं कळतंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close