इराकमध्ये बंडखोरांचा राडा ; भारतीय नागरीक अडकले

June 17, 2014 1:15 PM0 commentsViews: 1137

iraq_violence_ap_338x22517 जून : इराकमध्ये सरकार आणि बंडखोरांमध्ये ठिकठिकाणी धुमश्चक्री सुरू आहे. तिथल्या या युद्धग्रस्त स्थितीत 86 भारतीय नागरिकही अडकून पडले आहेत. यात बहुतांशी केरळमधल्या नर्सेस आहेत. इराकमधल्या भारतीय रा़जदूताने सांगितलंय की भारत सरकार या सगळ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व प्रयत्न करत आहे. 46 भारतीय नागरीक तिकरीत या शहरात अडकले आहेत असं सूत्रांकडून कळतंय. या शहरात इराकी सैन्य आणि बंडखोरांमध्ये लढाई सुरू आहे तसंच उरलेले 40 भारतीय मोसुल या शहरात अडकलेले आहेत.

केरळ नर्सेस असोसिएशनने केंद्र आणि राज्य सरकारने या नर्सेसच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाय करावेत असं आवाहन केलंय. काही नर्सेस पंजाबमधल्याही आहेत. सीएनएन आयबीएनने दोन नर्सेसशी बातचीत केली. दोघींनीही आम्हाला इराकमधून भारतात परत यायचं आहे असं म्हटलंय. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी म्हटलंय की, “आम्ही इंटरनॅशनल रेड क्रेसेंटच्या संपर्कात आहोत. इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांविषयी आम्हाला त्यांच्याकडून माहिती मिळेल.आम्ही इराकमध्ये संयुक्त राष्ट्रांशीही संपर्क ठेवून आहोत.त्यांनीही आम्हाला सहकार्य केलं आहे.”

close