आता बोला, 8 हजार कोटींचे प्रकल्प 68 हजार कोटींवर !

June 17, 2014 7:15 PM1 commentViews: 3747

5chitale_report_maharashtra irrigation scam17 जून : सिंचन घोटाळ्यावर डॉ.माधवराव चितळे समितीच्या अहवालामुळे अनेक बाबींचा खुलासा झालाय. या अहवालानुसार राज्यात सध्या 185 मोठे आणि मध्यम प्रकल्पांचं काम सुरू आहे. यापैकी 76 प्रकल्पांच्या सुधारीत प्रशासकीय मान्यता राज्य सरकारने दिल्यात तर उर्वरीत प्रकल्पांना सिंचन महामंडळानं दिल्या आहेत.

कार्यकक्षेनुसार चितळे समितीने सिंचन महामंडळाने दिलेल्या 100 प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता तपासल्या. त्यावरून 100 प्रकल्पांची मूळ प्रशासकीय किंमत 8 हजार 389 कोटी होती. पण 25 वर्षांनंतर या प्रकल्पांची किंमत 68 हजार 655 कोटी झाली. म्हणजेच 25 वर्षांत प्रकल्पांच्या किमतीत 60 हजार 266 कोटींची वाढ झाली. यातली दर सूचीतले बदल, आराखड्यामधील बदल आणि व्याप्तीचा विस्तार वाढल्याचा खर्च 18 हजार कोटींहून अधिक आहे. यातला काही खर्च हा जाणूनबुजून वाढवल्याचं दिसतंय.

एवढंच नाही तर बिगर सिंचनासाठी होणारी गुंतवणूक आक्षेपार्ह असल्याचा ठपका चितळे समितीने ठेवलाय. अनेक प्रकल्पांच्या बिगरसिचंनासाठी 15 टक्क्याहून अधिक खर्च होतोय. पण हा सर्व खर्च सिंचनाच्या नावाखाली ही आर्थिक बेशिस्त आहे असं चितळे समितीनं म्हंटलंय. महत्त्वाचं म्हणजे राज्यातल्या एकाही सिंचन प्रकल्पाचा समाप्ती अहवाल महामंडळांकडे उपलब्ध नाही. अनेकप्रकल्पांचं काम पूर्ण होऊनही त्यावर अजूनही खर्च सुरू असल्याचं आढळून आल्याचा ठपका चितळेनी अहवालात नमूद केला आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Subhash Niyogi

    ८ हजार कोटी प्रकल्पावर आणि ६० हजार कोटी स्विस बँकेत काय म्हणणे आहे?आता बोला!

close