मोदी सरकारने हाती घेतली ‘राज्यपाल हटाव’ मोहीम

June 17, 2014 7:23 PM0 commentsViews: 2180

team_modi_vs_Governors
17 जून : मोदी सरकारने कामाचा धडाका लावला असून कठोर निर्णय घेण्यासही सुरुवात केलीय. केंद्रातील भाजप सरकार पाच राज्यांचे राज्यपाल बदलण्याच्या विचारात आहे. यात उत्तर प्रदेश, केरळ, पंजाब, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे.

सध्या केरळच्या राज्यपाल शीला दीक्षित, पंजाबचे शिवराज पाटील, पश्चिम बंगालचे एम के नारायणन, तर मध्य प्रदेशचे राज्यपाल राम नरेश यादव आहेत. केंद्र सरकार राष्ट्रपतींकडे त्यांना बदलण्यासंदर्भात शिफारस करू शकतं. दरम्यान, उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी एल जोशी यांनी राजीनामा दिला आहे. तसंच आसाम आणि कर्नाटकच्या राज्यपालांनीही राजीनामे दिले आहे.

जे राज्यपाल राजीनामे देणार नाहीत त्यांची बदली होण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून समजतंय. दरम्यान, मी अफवांवर प्रतिक्रिया देऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया केरळच्या राज्यपाल शीला दीक्षित यांनी दिली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close