आमचा निकाल तरी सांगा हो !

June 17, 2014 8:52 PM0 commentsViews: 1422

®Ö10th result17 जून :दहावीचा निकाल जाहीर झाला कुठे जल्लोष तर कुठे निराशा पसरलीय पण ‘आमचा निकाल तरी सांगा हो’ असं विचारण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. मुंबईसह उपनगरातील काही विद्यार्थ्यांच्या प्रक्टिकलचे गूण मंडळाला न मिळाल्यामुळे त्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आल्यामुळे विद्यार्थी निराश झाले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल आज (मंगळवारी) जाहीर झाला. यंदाचा निकाल हा रेकॉर्ड ब्रेक लागला आहे. परिक्षेत यश मिळवण्यार्‍या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केलाय पण, काही विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आल्यामुळे विद्यार्थी निराश झाले.

 

पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवल्याची माहिती बोर्डाच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत यादव यांनी दिलीय. काही विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकलचे गूण संबंधित शाळांकडून आले नाही, तर उर्वरित विद्यार्थ्यांनी काही विषयांचे पेपर जुन्या अभ्यासक्रमातील तर काही नव्या अभ्यासक्रमातले दिले आहेत. या कारणांमुळे निकाल राखून ठेवण्यात आले आहे. विद्यार्थी जर आमच्याकडे आले तर त्यांचा निकाल सांगितला झाला आणि त्याना गुणपत्रिकाही वेळेवर मिळतील अशी हमीही यादव यांनी दिली. पण, याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसला. दहावीचा निकाल यंदा उशिराने लागला त्यातच निकाल राखून ठेवल्यामुळे आपला निकाल नेमका काय लागला याबद्दल या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा पडलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close