मनापासून सांगतो – मनसेचा जाहिरनामा प्रसिद्ध

April 18, 2009 8:13 AM0 commentsViews: 10

18 एप्रिल, मुंबई विनोद तळेकर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहिरनामा आज प्रसिद्ध केला. मनापासून सांगतो, असं नाव या जाहिरनाम्याला देण्यात आलं आहे. हा जाहिनामा प्रसिद्ध करताना राज ठाकरे यांनी पक्षाच्या अजेंड्यावर मराठी माणसूच असेल, असं सांगितलं. तसंच, पक्षाचे खासदार मराठीच्या मुद्द्यावर संसदेत मूग गिळून गप्प बसणार नाहीत, असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.स्वीस बँकेतला भारतीयांचा काळा पैसा परत भारतात आणू, या भाजप नेते लालकृष्ण अडवाणींच्या मुद्द्यावर ' आधी देशातल्या डबघाईला आलेल्या बँकाना वर आणलं पाहिजे. त्यानंतर स्वीस बँकेकडे लक्ष दिलं पाहिजे, ' अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

close