कांद्याचे लिलाव सुरू, व्यापार्‍यांचे आंदोलन स्थगित

June 17, 2014 9:10 PM0 commentsViews: 490

444onion_nasik17 जून : गेल्या दोन दिवसांपासून लेव्हीच्या प्रश्नावर कांदा व्यापार्‍यांनी दुकान बंदचा पवित्रा अखेर मागे घेतला आहे. कांद्याचे लिलाव उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय नाशिकमधल्या कांदा व्यापार्‍यांनी घेतला आहे. कांदा व्यापार्‍यांचं आंदोलन 10 जुलैपर्यंत स्थगित करण्यात आलंय. लेव्हीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचं आश्वासन पणन संचालकांनी दिलंय.

 

तर केंद्र सरकारनं केलं कांद्याचं निर्यातमूल्य प्रति टन 300 डॉलर निश्चित केलंय. त्यामुळे कांदा व्यापार्‍यांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय.दरम्यान, कांद्याची साठेबाजी करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल अशा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलाय. याबाबत पणन विभागाला कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

लेव्हीच्या प्रश्नावर सोमवारी कांद्याच घाऊक मार्केट बंद होतं. सरकारने मजुरीवर 44 टक्क्यांनी वाढ केली तसंच लेव्हीची थकबाकी त्वरित मिळावी अशी माथाडी बोर्डाची मागणी होती त्याविरोधात व्यापार्‍यांना बंदच हत्यार उपसलं होतं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close