पंढरपूरकरांची सटकली, पालकमंत्र्यांच्या गाडीवर टाकला कचरा

June 17, 2014 10:10 PM0 commentsViews: 6282

17 जून : विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी राज्यभरातून पंढरपूरकडे निघाले आहे पण शहारात अस्वच्छता आणि नागरी सुविधांनी त्रस्त झालेल्या पंढरपूरकरांनी आज (मंगळवारी)आषाढी वारीच्या निमित्ताने बोलावलेल्या बैठकीत प्रशासकीय अधिकारी आणि पालकमंत्री दिलीप सोपल यांच्यासमोर आपला रोष व्यक्त केला. संतापलेल्या शिवसैनिकांनी शहरातून गोळा करुन आणलेला कचरा आणि गटारातला गाळ पालकमंत्र्यांच्या गाडीवर टाकून आपला राग व्यक्त केला. आषाढी वारीपूर्वी चंद्रभागा नदी, शहरातल्या कचरा कुंड्या स्वच्छ कराव्या, वारकर्‍यांना पुरेशा मुलभूत सेवा सुविधा पुरवाव्या, अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. यावर दिलीप सोपल यांनी आंदोलकांच्या भावना आपण समजून घेऊन लवकरच नियोजन करू असं आश्वासन दिलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close