बाबरी मशीद पाडण्यात काँग्रेसचाही हात : लालूंचा काँग्रेसवर हल्लाबोल

April 18, 2009 8:09 AM0 commentsViews: 7

18 एप्रिल राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आता काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. बाबरी मशीद पाडण्यात काँग्रेसचाही हात होता,असा सनसनाटी आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. बिहारमध्ये प्रचार सभेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर हे टीकास्र झोडलं. 'माझ्या वाटेला कोणत्याही राजकीय पक्षाने जाऊ नये आणि मला तोंड उघडण्यास प्रवृत्त करू नये. अन्यथा सगळ्या पक्षांचा लढा माझ्याशी आहे. सध्या राजकारणात सगळ्याच पक्षांचे ग्रह फिरले आहेत त्यामुळे सबुरीने घ्यावं' असाही इशारा लालूंनी यावेळी दिला. काँग्रेसवर आरोप करत लालूंनी राहुल गांधीवरही टीका केली आहे.

close