चेन्नईकरांना ‘दिल से’ सलाम, वाहतूक थांबवून तरुणीचे वाचवले प्राण !

June 18, 2014 10:16 AM3 commentsViews: 8107

ऍना आयझॅक, चेन्नई

18 जून :  चेन्नई ट्रॅफिक पोलीस आणि दोन हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांच्या पथकांनी केलेल्या जलद हालचालींमुळे एका 21 वर्षांच्या मुंबईकर मुलीचे प्राण वाचलेत. या सर्वांनी वाहतूक थांबवून काही मिनिटांतच प्रत्यारोपणासाठीचं हृदय एका हॉस्पिटलमधून दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. चेन्नईनं घालून दिलेला धडा सर्वांनीच शिकावा, असा आहे.

वाहतुकीचा खोळंबा म्हणजे वैताग पण, चेन्नईत जो वाहतुकीचा खोळंबा झाला त्यानं एक जीव वाचवला. मुंबईतल्या 21 वर्षांच्या होवीला बसवण्यात येणारं हृदय तात्काळ एका हॉस्पिटलमधून दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी सोमवारी चेन्नईत वाहतूक पोलिसांना काही काळ वाहतूक पूर्णपणे थांबवली.

अपघातात मृत्यू झालेल्या 27 वर्षांच्या मुलाचं हृदय एका खास डब्यातून नेण्यात आलं. ऑर्गन डोनेशनमध्ये वेळेला खूप महत्त्व असतं. राजीव गांधी सरकारी हॉस्पिटल ते फोर्टिस मालार हॉस्पिटल हे 12 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी तासभर वेळ लागला असता. पण 26 वाहतूक पोलीस ठराविक अंतरावर तैनात करण्यात आले. त्यामुळे विना अडथळा हे अंतर फक्त 14 मिनिटांत पूर्ण करता आलं.

काल आम्हाला हृदय 14 मिनिटांत मिळालं आणि आम्ही दीड तासात शस्त्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे दोन तासांत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आणि शस्त्रक्रिया झाल्यावर हृदय पुन्हा धडधडू लागलं असं कार्डियाक सायन्सेसचे HOD डॉ. सुरेश राव म्हणाले.

महिनाभरापासून हृदय देणार्‍या अवयवदात्याची वाट बघणार्‍या 21 वर्षांच्या होवीला नवं आयुष्य मिळालं. संपूर्ण कुटुंबाच्या चेहर्‍यावर समाधान दिसलं.

माझी मुलगी खूप आनंदात आहे. ती खूपच बदलल्याचं मला जाणवलं. तिने हसून माझ्याकडे बघितलं जणू तिची ही नवी इनिंग आहे. आम्ही खूपच आभारी आहोत, असं होवीचे वडील कॅप्टन मिनोचरहोम म्हणाले.

इतरही पेशंट्स आहेत जे दोन-तीन महिन्यांपासून ट्रान्सप्लँटची वाट पाहताहेत. आपला मुलगा गमावला असताना दुसर्‍याचा विचार करण्यासाठी खूप हिंमत लागते. मी त्याच्या आईचे आभार मानते आणि देव तिला हे दु:ख सहन करण्याची ताकद देवो, अशी प्रार्थना करते अशी आशा होमीची आई अमैती यांनी व्यक्त केली.

चेन्नईत अशा पद्धतीनं संपूर्ण वाहतूक थांबवण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वीही अशी एक घटना ‘ट्रॅफिक’ या मल्याळी सिनेमातही दाखवण्यात आली होती. पण पोलीस आणि डॉक्टरांनी एकत्रित येऊन दाखवलेली ही तत्परता इतर शहरांसाठीही एक धडा आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Santosh Tandale

  salute

  • aMOL

   Dilse Salute chennai..

 • parshuram bhandekar

  छान चे ट्रा पोलिसांना मानाचा मुजरा…….

close