मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर कारवर हल्ला, 75हजारांची रोकड पळवली

June 18, 2014 10:49 AM0 commentsViews: 2555

tunnel-entry-shabab-khan18  जून :  मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील कामशेतजवळ सोमवारी पहाटे रस्त्याच्या कडेला थांबवलेल्या गाडीतील आई आणि मुलीला लुटण्याचा प्रकार घडला. लोखंडी गजाने मारहाण करून 75 हजारांची रोकड असलेली बॅग पळवली. हेरेषू अमित माळी आणि वेदिका अमित माळी या जखमी झाल्यात.

चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले असून, पोलीस शोध घेत आहेत. गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून पाणी आणण्यासाठी अमित माळी गेले असता चोरट्यांनी चारचाकी गाडीच्या काचा फोडून गजाने मारहाण करून पैशांची बॅग घेऊन पळून गेले. बँकॉक वरून हेरेषू व वेदिका आल्या होत्या.हे सर्व मुंबईहून पुण्याकडे जात होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close