इराक : मोसुलमध्ये अडकलेल्या 40 भारतीयांचं अपहरण झाल्याची भीती

June 18, 2014 11:22 AM0 commentsViews: 1004

Iraq_MilitantMassExecTweets18  जून : इराकमध्ये सरकार आणि बंडखोरांमध्ये ठिकठिकाणी धुमश्चक्री सुरू आहे. तिथल्या युद्धग्रस्त स्थितीत 86 भारतीय नागरिकही अडकून पडले आहेत. मोसुलमध्ये अडकलेल्या 40 भारतीयांशी अजून संपर्क होऊ शकलेला नाही, त्या भारतीयांचं अपहरण झालंय की नाही हे आता सांगणं कठीण असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. भारताचे इराकमधील माजी राजदूत अडकलेल्या लोकांना मदत करायला बगदादला जातील, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

इराकचं सैन्य आणि बंडखोरांमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. यामुळे इराकमधलं वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. मोसुलमध्ये अडकलेल्या 40 भारतीयांशी आतापर्यंत कोणताही संपर्क झालेला नसून ते बेपत्ता आहेत. त्यांना सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य सरकारने या नर्सेसच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाय करावेत असं आवाहन केरळ नर्सेस असोसिएशनने केलं आहे.

दरम्यान, काही नर्सेस पंजाबमधल्याही आहेत. सीएनएन आयबीएनने दोन नर्सेसशी बातचीत केली. दोघींनीही आम्हाला इराकमधून भारतात परत यायचं आहे असं म्हटलं आहे तर दुसरीकडे आम्ही इंटरनॅशनल रेड क्रेसेंटच्या संपर्कात आहोत. इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांविषयी आम्हाला त्यांच्याकडून माहिती मिळेल. आम्ही इराकमध्ये संयुक्त राष्ट्रांशीही संपर्क ठेवून आहोत. त्यांनीही आम्हाला सहकार्य केलं आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी म्हटलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close