वरुण आणि अडवाणी भेट : आश्वासनं, सल्लामसलतीची देवाणघेवाण

April 18, 2009 8:58 AM0 commentsViews: 1

18 एप्रिल इटाह जेलमधून पॅरोलवर सुटलेल्या पिलिभीत मतदार संघातील भाजपाचेतरूण उमेदवार वरुण गांधी यांनी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी अडवणी यांच्याशी घेतलेली ही पहिलीच भेट होती. कोणालाही दुखवणार नाही, असं आश्वासन या भेटीत वरुण गांधींनी अडवाणी यांना दिली आहे. यापुढे भाषण करताना वरुण गांधींनी संयम बाळगावा, असा सल्लाही अडवाणींनी वरुण गांधी यांना दिला आहे. एकीकडे भाजपातर्फे मनेका गांधी आज रायबरेलीतल्या आवला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी पूजा केली. तर वरुण गांधीही अडवाणींच्या भेटीनंतर आवलात दाखल होणार आहेत.

close