मनसेच्या ब्लु प्रिंटअगोदर शिवसेना मांडणार ‘महाराष्ट्र मॉडेल’ ?

June 18, 2014 4:53 PM1 commentViews: 3989

raj_udhav

18 जून : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शिवसेनेचा उत्साह द्विगुणा झालाय. विधानसभेसाठी आता शिवसेनेनं मोर्चेबांधणीसाठी हालचाल सुरू केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहर आणि ग्रामीण विकास आराखड्यासह शिवसेना निवडणुकीला सामोरे जाणार आहे. मनसेची ब्लु प्रिंट येण्याआधी विकास आराखडा लोकांसमोर यावा असा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा शिवसेनाला चांगलाच फायदा झाला. शिवसेनेचे 18 उमेदवारवर निवडून आले, विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच शिवसेना लोकसभेला सामोरं गेली. शिवसेनेचे राज्यात 20 पैकी 18 उमेदवार निवडून आले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर एकाप्रकारे शिक्कामोर्तब झालं. तर दुसरीकडे लोकसभेत सपाटून पराभवाला सामोरं गेलेल्या मनसेनं विधानसभेसाठी जय्यत तयारी सुरू केली. खुद्ध राज ठाकरे यांनी विधानसभा लढवणार असल्याची गर्जना केलीय. आमदारकीसाठी निवडणूक लढवणार आणि जनतेनं कौल दिला तर मुख्यमंत्रीपदी सांभाळणार असंही राज यांनी स्पष्ट केलं. राज यांच्या खेळीमुळे शिवसेनेनंही कंबर कसली. सेनेकडून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करावे अशी चर्चा सेनेत सुरू आहे. विधानसभेला सामोरं जाण्यासाठी शिवसेनेनं मोदींच्या ‘गुजरात मॉडेल’ अंगीकारले आहे. राज यांच्या ब्लु प्रिंटला टक्कर देण्यासाठी सेनेनं विकासाचं सूत्र हाती घेतलं आहे. मुंबई विकासचा प्लॅन तसंच नव्यानं तयार होत असलेल्या शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन शिवसेनेने तयार केला आहे. हा डेव्हलपमेंट प्लॅन शिवसैनिक आणि पदाधिकार्‍यांना दाखवण्यात येणार, त्या नंतर उद्धव ठाकरे काही दिवसांनी डेव्हलपमेंट प्लॅन जनतेसमोर मांडणार असल्याचं कळतंय. उद्या शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या शिवसेनेचं दोन दिवसाचं शिबिर बांद्रयाच्या रंगशारदा इथे होतंय.

288 मतदारसंघाचा आढावा

या कार्यक्रमात उद्धव ठाकरे 288 मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्याचं सर्वेक्षण व्हावं यासाठी 10 लाख सह्यांची मोहीम राबवणार आहे. गड किल्ल्यांना केंद्राने निधी द्यावा यासाठी पंतप्रधानांना 10 लाख सह्यांचं निवेदन देणार आहे. शिवसेना स्वतंत्र लढल्यास किती मतदार संघात ताकदीचे उमेदवार आहेत? याची चाचपणीही करणार असल्याचं कळतंय. 288 मतदार संघाचे बूथ मेंबर नोंदणी आणि ज्या मतदार संघात सेनेचा उमेदवार नाही तिथे दुसर्‍या पक्षाचा ताकदीचा उमेदवाराचा पर्याय देणे आणि 288 मतदारसंघात ‘गाव तिथे शिवसेना’ असा कार्यक्रमही हाती घेतला जाणार आहे. विशेषत:पूर्व विदर्भावर सेना विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे. राज्यातल्या 6 महसूल विभागाच्या मुख्यालय असलेल्या शहरात स्वतंत्र सभा घेणार असून शिवबंधन गाव पातळीपर्यंत नेणार असल्याचं नियोजन सेनेनं आखलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • niranjan chavan

    महाराष्ट्राचा पिंजून काढायच्या आधी फक्त मुंबई फिरून पहावी उद्धव ठाकरे यांनी काय वाटत लावली आहे तुमच्या महानगर पालिकेने रस्ता आहे कि रस्त्यात खडे आहेत कळत नाही मुंबईमध्ये नदी आहे कि कचर्याने भरलेले नाले आहेत तेच कळत नाही
    नाले साफ केल्याचे पोकळ दावे करू नका आधी मुंबई फिरून मुंबई साफ करा मग महाराष्ट्र पिंजून काढायला जा

close