‘काका-पुतण्यांचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही’ : उद्धव ठाकरे यांची टीका

April 18, 2009 11:00 AM0 commentsViews: 7

18 एप्रिल 'काका-पुतण्यांचं राज्य महाराष्ट्रात चालणार नाही', अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या पत्रकारपरिषदेत बोलताना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील राजकीय मतभेदांवर बोट ठेवून त्यांच्या वैयक्तिक नातेसंबंधांवरही तोफ डागली आहे. प्रचारापासून दूर असल्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अस्वस्थ आहेत. त्यांना प्रचारात सहभागी व्हायची इच्छा आहे पण अस्थिर तब्येतीमुळे ते येऊ शकत नसल्याचं सांगून सध्या शिवसेनेचा कार्यभार आणि पक्षाच्या निवडणुक प्रचाराची जबाबदारी कार्याध्यक्ष म्हणून आपणंच पार पाडणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

close