खूशखबर, 5 रुपयांत मेट्रोचा गारेगार प्रवास !

June 18, 2014 9:38 PM0 commentsViews: 2052

metro18 जून : मुंबईकरांच्या दिमतीत दाखल झालेल्या मेट्रोवर मुंबईकरांचे उदंड प्रेम पाहून मेट्रो व्यवस्थापनाने पाच रुपयांत प्रवास करण्याची मुभा दिली आहे. उद्यापासून पुढच्या गुरुवारपर्यंत मेट्रोचा प्रवास फक्त पाच रुपयांत करता येणार आहे. पहाटे साडे पाच ते सकाळी 8 वाजेपर्यंत ही सवलत दिली जाणार आहे.

शनिवार आणि रविवारी मात्र ही सवलत लागू नसणार आहे. विशेष म्हणजे मेट्रोने लोकलच्या तिकीटाची बरोबरी करुन करुन मुंबईकरांना दिलासा दिलाय. मेट्रोचा गारेगार प्रवासाची मजा लुटण्यासाठी मुंबईकरांची झुंबड उडालीय. वर्सोवा ते घाटकोपर अशा 13 किलोमीटर मार्गावर मेट्रो सुसाट धावत आहे. मेट्रोचे तिकीट दर सध्या महिन्याभरासाठी 10 रुपये इतके ठेवण्यात आले आहे.

त्यातच प्रवाशांना मेट्रो सफर करण्यासाठी 5 रुपयांत प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणार्‍या चाकरमान्यासाठी चांगली संधी चालून आलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close