जाधवांची उचलबांगडी ?; तटकरे,आबांचं नाव चर्चेत

June 18, 2014 10:05 PM0 commentsViews: 1277

bhaskar jadhav vs tatkare18 जून : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला. त्यामुळे पक्षसंघटनेत बदल करण्याची चर्चा होतेय. काँग्रेसप्रमाणे आता राष्ट्रवादीतही प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू झालीय.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव पक्षसंघटनेला बळ देण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांची उचलबांगडी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या जागी ज्येष्ठ, अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्ष करण्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विचार आहे.

त्यांच्या जागी प्रदेशाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, गृहमंत्री आर.आर. पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची नावं चर्चेत आहेत. याबाबतचा निर्णय लवकर होण्याची अपेक्षा आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close