मुंबई इंडियन्सची आयपीएलमध्ये विजयी सलामी

April 18, 2009 4:21 PM0 commentsViews: 2

18 एप्रिल, केपटाऊन सचिनच्या मुंबई इंडियन्सनं आयपीएलमध्ये विजयी सलामी दिली. सलामीच्या मॅचमध्येच त्यांनी धोणीच्या चेन्नई इंडियन्सचा 19 रन्सनं पराभव केला. या सामन्यात सचिन मॅन ऑफ द मॅच ठरला. दुनिया हिला देंगेचं स्लोगन मुंबई इंडियन्सनं आज पहिल्याच मॅचमध्ये खरं करून दाखवलं.सचिन तेंडुलकर आणि शिखर धवन यांनी मुंबई इंडियन्सला सन्मानजनक स्कोर उभारून दिला. त्यापूर्वी सनथ जयसूर्याने वीस बॉल्समध्ये 26 रन्स केले. सचिननं आयपीएलमधील आपली दुसरी हाफसेंच्युरी ठोकली. त्यानं 49 बॉलमध्ये 59 रन केले. त्यात 7 फोरचा समावेश होता. अभिषेकनं 14 बॉलमध्ये 35 रन केले. त्यात दोन फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. चेन्नईचे पार्थीव पटेल, मॅथ्यू हेडन, रैना आणि फ्लिंटॉप हे स्टार बॅटसमन शंभर रन्समध्येच आऊट झाले. त्यापैकी मॅथ्यू हेडननं 44 रन्स करीत थोडीबहुत झुंज दिली. अखेर मुंबई इंडियन्सनं ही मॅच 19 रन्सनं जिंकली.

close