इराकमध्ये अपहरण झालेले भारतीय सुरक्षित !

June 19, 2014 4:18 PM0 commentsViews: 432

67iraq_indian19 जून : इराकमधली परिस्थिती दिवसेंदिवस अधिक चिघळत चाललीय. आयसीस या दहशतवादी संघटनेनं 40 भारतीयांचं अपहरण केलंय. पण इराक सरकारने पहिल्यांदाच याबाबत माहिती दिली आहे. सर्व भारतीय नागरीक सुरक्षित आहे पण त्यांची संख्या आणि ठावठिकाणा अजून लागलेला नाही असं सांगितलंय.

अपहरण झालेले बहुतांशी भारतीय ‘तारिक उर अलहूद’ या कंपनीत काम करणारे पंजाबचे कामगार आहेत. यापैकी काही जणांनी आपल्या कुटुंबीयांना पाठवलेले अलीकडचे फोटो आयबीएन-नेटवर्कला मिळाले आहेत. त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. अपहरण झालेल्या भारतीयांचे नातेवाईक चिंतेत आहेत. नातेवाईकांनी दिल्लीत जाऊन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांची भेट घेणार आहेत.

अपहरण झालेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असं आश्वासन सुषमा स्वराज यांनी दिलंय. अपहरण झालेल्यांचा नेमकं ठिकाण अजून माहिती झालेलं नाहीय आणि अजून खंडणीसाठी कुणाचाही फोन आला नाही, असं सरकारनं सांगितलंय.  +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close