छत्तीसगडचे राज्यपाल शेखर दत्त यांचा राजीनामा, पुढचा नंबर नागालँडचा?

June 19, 2014 7:23 PM0 commentsViews: 582

cvshekhar-dutt19 जून : यूपीए सरकारच्या काळात ज्या ज्या राज्यात राज्यपाल नियुक्त करण्यात आले होते त्या राज्यपालांना राजीनामा देण्याचे आदेश मोदी सरकारने दिले आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी.एल.जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ आता छत्तीसगडचे राज्यपाल शेखर दत्त यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला.

 

पुढचा नंबर नागालँडच्या राज्यपालांचा असू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनी या आधीच राजीनामा दिला आहे. बुधवारी महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलंय. केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी यासंदर्भात राज्यपालांशी फोनवरून बातचीत केली. पण राष्ट्रपती भवनाकडून निरोप आल्यानंतर राजीनामा देणार अस सांगून के. शंकरनारायणन यांनी नकार दिला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close