कसाबच्या आईला संरक्षण देणार – अशोक चव्हाण

April 18, 2009 4:47 PM0 commentsViews: 39

18 एप्रिल, शिर्डी एक विदेशी नागरिक म्हणून कसाबच्या आईला संपूर्ण संरक्षण दिलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. तशी माहिती त्यांना शिर्डीत पत्रकारांना दिली आहे. मुंबई हल्ल्यातला एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याची आई त्याला भेटायला भारतात येणार आहे. तेव्हा त्याच्या आईच्या सुरक्षेबाबतच अशोक चव्हाण यांना विचारण्यात आलं. त्यावेळी कसाबच्या आईच्या बाबतचे सगळे निर्णय पोलिसचं घेतील असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

close