इराक : ‘त्या’ 40 भारतीयांचा ठावठिकाणा सापडला

June 19, 2014 10:55 PM0 commentsViews: 1375

2444iraq19 जून : इराकमध्ये 40 भारतीय नागरीकांचं अपहरण झालं असून त्यांचा आता ठावठिकाणा सापडला आहे. पण त्यांना आता लगेच परत आणू शकत नाही. इराकमधली परिस्थिती सध्या तशी नाही, असं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलंय.

 

या 40 जणांचा ठावठिकाणा आम्ही आता जाहीर करू शकत नाही, असंही परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं. तसंच या कर्मचार्‍यांसह 40 भारतीय नर्सेसही अडकल्या आहेत. या नर्सेस सुरक्षित आहेत. त्यांना आम्ही घरातच रहा म्हणून सांगितलंय, अशी माहिती पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी दिली.

 

स्वराज आणि बादल यांनी नवी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. इराकमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चाललीय. परदेशी नागरीकांना टार्गेट करत आयसीस या दहशतवादी संघटनेनं 40 भारतीयांचं अपहरण केलंय. अपहरण झालेले बहुतांशी भारतीय ‘तारिक उर अलहूद’ या कंपनीत काम करणारे पंजाबचे कामगार आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close