उल्हासनगरमध्ये सेनेनं केला सिंधीतून प्रचार

April 18, 2009 4:53 PM0 commentsViews:

18 एप्रिल, उल्हासनगरमराठीचा मुद्दा आपलाच असं सांगणा-या शिवसेनेनं उल्हासनगरमधून चक्क सिंधी भाषेतून प्रचार केला. कल्याणचे शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे यांचा तो सिंधी भाषेतला प्रचार होता. शिवसेनेची प्रचार रॅली म्हणजे मराठीतून दिल्या जाणार्‍या गगनभेदी घोषणा, भगवे झेंडे, तुतारी, मावळे, असं अगदी मराठमोळं वातावरण होतं. पण सिंधीतून आनंद परांजपेंना मत द्या अशा घोषणा सिंधी भाषेतून दिल्या गेल्या होत्या. उल्हासनगरमधल्या सिंधी भाषकांना आपल्याकडं वळवण्यासाठी हा प्रचार केला होता. शिवसेनेचा सिंधी भाषेतला प्रचार ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close