30 ते 45 हजार शिक्षकांना घरी बसण्याची वेळ?

June 20, 2014 2:13 PM0 commentsViews: 11910

teacher20 जून : मोदी सरकारने कामाचा सपाटा लावलाय पण त्यांच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. पटसंख्येचा निकष आणि नव्या स्टाफिंग पद्धतीमुळे हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले जाण्याची भीती निर्माण झालीय. शिक्षण हक्क कायद्यातल्या या काही तरतुदींचा जबर फटका सुमारे 30 ते 45 हजार शिक्षकांना घरी बसण्याची शक्यता आहे.

या शिक्षकांना सामावून घेण्याची जागाच नसल्याने त्यांच्या नोकरीवरच गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात मुंबईतल्या दीड हजार शिक्षकांचा समावेश आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची पगारबिलं काढू नका, असे तोंडी आदेश शिक्षणाधिकार्‍यांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत. त्यामुळे शिक्षकामंध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, या जाचक तरतुदींविरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा पवित्र शिक्षक भारतीनं घेतला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close