संशयीत मृतदेह राणेंच्या भावाचाच – पोलिसांचा दुजोरा

April 20, 2009 9:17 AM0 commentsViews: 2

20 एप्रिल, कणकवलीकणकवलीजवळ जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह अंकुश राणे यांचा असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याचा चेहरा ओळखता येत नव्हता. त्यामुळे सापडलेला मृतदेह नक्की अंकुश राणे यांचा आहे यावर पोलीस ठाम नव्हते. परंतु पोस्ट मार्टेमचा जसा अहवाल आला आहे, तसं पोलिसांनी रविवारी संध्याकाळी कणकवलीपासून 17 किलोमीटर अंतरावर असणार्‍या कासार्डे गावाजवळ चेहरा जाळलेला मृतदेह हा अंकुश राणे यांचा असल्याचं स्पष्ट केलं आहे. या घटनेनंतर कणकवलीत तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचं सांगितलं आहे. आता कणकवली पोलीस या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एसीपी रवीन्द्र शिसवे यांनी दिली आहे. तर अंकुश राणे यांचं कुणाशीही वैर नव्हतं, आणि निवडणूक प्रचाराशी त्यांचा काही संबंध नव्हता अशी माहिती अंकुश राणेंचे सख्खे भाऊ कांता राणे यांनी दिलीये.

close