आळंदीमधून माऊलींचं प्रस्थान

June 20, 2014 9:34 PM0 commentsViews: 588

20 जून : आज ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात आळंदीमधून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालं. यावेळी मोठ्या प्रमाणात वैष्णवांचा मेळा उसळला होता. टाळ मृदुगांचा गजरात ‘मना एक करी जाईन पंढरी… उभा विटेवरी तो पाहेन सावळा’ असं म्हणत वारकरी सज्ज झालेत. आज पालखीचा मुक्काम हा माऊलींच्या आजोळी म्हणजेच आळंदीत आहे. पालखीने मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर मुक्कामी पोहचली आहे. या ठिकाणी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. उद्या पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान करेल.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close