सर्वसामान्यांसाठी महाराष्ट्र सदन परकेच !

June 20, 2014 10:06 PM1 commentViews: 2052

maharashtra_sadan20 जून : दिल्लीमध्ये मोठा दिमाखात भव्य अशी महाराष्ट्र सदनाची इमारत उभारण्यात आलीय पण या सदनात राहण्यासाठी आता चांगलीच किंमत मोजावी लागणार आहे. महाराष्ट्र सदनात सामान्य माणसांसाठी अव्वाच्या सव्वा दर लावल्याचं समोर आलंय.

ज्या रुम्समध्ये जेवणही आणून दिले जात नाहीत तिथंही सामान्य माणसाला तब्बल 6 हजार मोजावे लागणार आहे. सदनाचं उत्पन्न वाढावं आणि सरकारी तिजोरीवरचा भार कमी व्हावा, म्हणून हे नवे दर ठरवण्यात आले आहेत, असं सरकारच्या नव्या आदेशात स्पष्ट करण्यात आलंय पण त्याचवेळी आमदारांना मात्र सवलत देण्यात आलीय.

खासगी कामासाठी येणार्‍या आमदारांना फक्त एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत तर उपसचिव आणि त्यापेक्षा वरिष्ठ अधिकार्‍यांना केवळ 300 रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे या सदनामध्ये महाराष्ट्रयीन माणूस दिल्लीमध्ये येऊन सदनात राहू शकेल का? असा प्रश्न उपस्थित झालाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Pradipvasant Pawar

    jyachya paisyavar bandhale to upekshit! purvichya kali rajmahal bandhalevar karagirache hat todle jayache tasala prakar jhala!

close