दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि डेक्कन चार्जर्सची धडाकेबाज सुरुवात

April 20, 2009 10:38 AM0 commentsViews: 16

20 एप्रिल, केपटाऊनरोमा खन्ना वीरेंद्र सेहवागच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सनं युवराजच्या पंजाब किंग्ज इलेव्हनचा धुव्वा उडवत आपली पहिली मॅच जिंकली. तर डेक्कन चार्जर्सनं कोलकाता नाईट रायडर्सवर आठ विकेट्सनं मात केली. रविवारच्या संपूर्ण दिवसावर केप टाऊनमध्ये पावसाचं सावट होतंच आणि मॅच सुरू होण्याच्या आधीच पाऊस सुरू झाला. त्यामुळे मॅच जवळपास 2 तास उशिरानं सुरू झाली.आणि मॅच प्रत्येकी 12 ओव्हर्सची करण्यात आली.पंजाब किंग्जची ओपनिंग जोडी करण गोएल आणि रवी बोपारानं सुरुवातच फटकेबाजीनं केली.सुरुवातीला काही फोर मारल्यानंतर गोएलनं काही सिक्सही लगावले. त्यावेळी पंजाब किंग्जची मालक प्रिती झिंटाही त्याला चिअर करत होती. पण यो महेशनं त्याची विकेट घेतली आणि स्कोरमध्ये कमालीचा फरक पडला आणि व्हिटोरीच्या बॉलिंगमुळे तर किंग्जच्या रन्सला ब्रेकच लागले. त्यानं बोपारा, संघकारा आणि जयवर्धनेच्या विकेट्स घेतल्या. कॅप्टन युवराजनं मारलेल्या सिक्सच्या आधारे किंग्जनं 100 रन्सचा टप्पा पार केला.दिल्लीनं डेअरडेव्हिल्सनी सुरुवात दणदणीत केली. पण पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आणि मॅच थांबली. खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा दिल्ली डेअरडेव्हिल्सला सहा ओव्हर्समध्ये 54 रन्स करायचे होते. 7 बॉल बाकी ठेऊन सेहवाग आणि गंभीरनं हे टार्गेट पार केलं आणि दिल्लीनंही विजयी सलामी दिली.डेक्कन चार्जस आणि कोलकोता नाईट रायडर्समधील मॅच चांगलीच रंगतदार ठरली. गिलख्रिस्टच्या डेक्कन चार्जसनं ही मॅच 8 विकेट राखून जिंकली. कोलकाता नाईट राडर्सनी डेक्कन चार्जसपुढं विजयासाठी 102 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. कोलकाता नाईट रायडर्सच्या ब्रॅड हॉगनं एकाकी झुंज देत 34 बॉलमध्ये 31 रन केले त्यात 4 फोरचा समावेश होता. गेल आणि चोप्रानं त्याला थोडीबहुत साथ दिली पण इतर स्टार बॅटसमन मात्र अपयशी ठरले… कॅप्टन ब्रँडन मॅक्युलम आणि सौरव गांगुली फक्त 1 रन करू शकले. डेक्कनतर्फे आरपी सिंगन सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर प्रग्यान ओझा आणि स्टायरीसनं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. विजयासाठी 102 रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या डेक्कन चार्जसतर्फे ऍडम गिलख्रिस्ट आणि रोहित शर्मान ंजबरदस्त बॅटिंग केली.

close