रेल्वे दरवाढीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर

June 21, 2014 1:27 PM0 commentsViews: 1898

delhi_congress_protect21 जून : मोदी सरकारने केलेल्या 14 टक्के रेल्वे भाडेवाढीविरोधात विरोधकांनी आंदोलन सुरू केलंय. दिल्लीत काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. दिल्लीत पंतप्रधान कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना पाण्याचा फवारा करावा लागला.

त्याचपाठोपाठ वाराणसी, भुवनेश्वरमध्ये काँग्रेस आणि सीपीआयच्या कार्यकर्त्यांनी दरवाढीचा निषेध केला. रस्त्यावर उतरून मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.

दुसरीकडे, समाजवादी पक्षानेही रेल्वे भाडेवाढीचा विरोध केलाय. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाराणसी आणि अलाहाबादमध्ये निदर्शनं केली. सपाच्या कार्यकर्त्यांनी अलाबाबादमध्ये रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करत वाहतूक बंद पाडली. तर कायदंमंत्री रविशंकर प्रसाद यांनी रेल्वे भाडेवाढीचं समर्थन केलंय. त्याचबरोबर हा कठीण निर्णय घेण्याची गरज यूपीए सरकारच्या भोंगळ कारभारामुळे आली असा दावाही त्यांनी केला. तरया दरवाढीचं रेल्वे मंत्रालयाने समर्थनं केलंय.

रेल्वे बोर्डाचं स्पष्टीकरण

“14.2 % प्रवासी भाडेवाढ आणि 6.5 % मालवाहतुकीची भाडेवाढ करताना त्यात इंधनावर होणार्‍या खर्चाचा विचार करण्यात आलाय. सहा महिन्यातून एकदा इंधन खर्चाचा अशा पद्धतीने आढावा घेतला जातो. या आधीच्या सरकारनेही इंधनदराचा आढावा घेऊन दोन वेळा रेल्वे भाड्यात बदल केले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भाडेवाढ लागू करण्यात आली होती.”

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close