मुंबईकरांचे ‘बुरे दिन’, लोकलचा पास दुपट्टीने महागला

June 21, 2014 12:29 PM1 commentViews: 2845

mumbai_local_fair21 जून : ‘अच्छे दिन आने वाले हैं’ असं स्वप्न मोदींनी दाखवलं होतं पण सरकार स्थापन होऊन महिना होत नाही तेच मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला पहिलाच झटका देत रेल्वेच्या दरात 14.2 टक्क्यांची घसघशीत वाढ केली. या दरवाढीत मुंबईकरांच्या खिशाला आता चांगलीच कात्री लागली आहे. मुंबईकरांच्या लाडक्या लोकलचा महिन्याचा पास हा थोडा थोडका नव्हे तर दुपट्टीने वाढला आहे.

चर्चगेट ते दादरपर्यंतचा सेकंड क्लासच्या प्रवासासाठी महिन्याला पूर्वी 115 रुपये मोजावे लागत होते ते आता तब्बल 330 रुपये मोजावे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला आता तब्बल 215 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. सीएसटी ते ठाणेसाठी महिन्याला 190 रुपये मोजावे लागत होते आता 645 रुपये मोजावे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला आता 455 रुपये मोजावे लागणार आहे.

फर्स्ट क्लासच्या प्रवासासाठी तर हेच दर आणखी महागले आहे. फर्स्ट क्लासचा चर्चगेट ते अंधेरीपर्यंतच्या प्रवासासाठी पूर्वी 580 रुपये मोजावे लागत होते ते आता तब्बल 1,310 रुपये मोजावे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला आता 730 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. सीएसटी ते ठाणे असा प्रवास केला तर पूर्वी 655 रुपये मोजावे लागत होते ते आता 1,310 रुपये मोजावे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला आता 655 रुपये अधिक द्यावे लागणार आहे.

पास महागला – सेकंड क्लास

प्रवास पूर्वीचं भाडं          आताचं भाडं
चर्चगेट-दादर     115     330
चर्चगेट-अंधेरी 190 480
चर्चगेट-विरार 280 645
सीएसटी-ठाणे 190 480
सीएसटी-कल्याण 280 645
सीएसटी-वाशी 240 640
सीएसटी-पनवेल 335 720

 

फर्स्ट क्लास

प्रवास पूर्वीचं भाडं          आताचं भाडं
चर्चगेट-दादर     580 1310
चर्चगेट-अंधेरी 655 1310
चर्चगेट-विरार 1035 1960
सीएसटी-ठाणे 655    1310
सीएसटी-कल्याण 965 1960
सीएसटी-वाशी 710 1320
सीएसटी-पनवेल 1035 1960

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • suresh

    aache dinno ka pata nahi pan bure din shuru ho chuke hain

close