ज्ञानेश्वर माऊलींचं पुण्यात आगमन

June 21, 2014 6:33 PM0 commentsViews: 848

5mauli+palkhi_pune21 जून : ज्ञानोबा माऊलींचं पुण्यात आगमन झालं आहे. आज माऊलींच्या पालखीचा पुण्यात मुक्काम असणार आहे. तिकडे तुकाराम महाराजांचीही पालखी पुणे मुक्कामी आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरात असेल.ज्ञानोबांच्या पालखीचं पुणेकरांंनी जोरदार स्वागत केलं. ज्ञानोबा माऊलींच्या पालखी पालखी विठोबा मंदिरात विसावेल. या दोन्ही पालख्यांचं पुण्यातील आगमन हा पुणेकरांसाठी दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. या पालखीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close